Saturday, January 20, 2018

रात्री माझं गावं विकताना पाहिलं

.           *रात्री माझं गावं विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गावं विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलिसाठी गरीबाला मि लाचार होताना पाहिल,
रात्री मि *माझ गाव विकताना पाहिल*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वताचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गावं विकताना पाहील*

गरिबांना पायदळी तुडवणार
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याच जोड केवढ घासल
वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी गावं विकताना पाहील*

लोकशाही ढाब्यावरच बसुन त्याने तोडलेत गरीबांचे आज लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली

त्या वाहणा-या विषारी दारुत
आज माझ गावही वाहिल,  मटनाच्या 2 रव्यापाई, पुन्हा 5वर्ष गरीबच राहील,,,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझ गावं विकताना पाहिल*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहील.....!
रात्री *मि गांव माझ विकताना पाहिल*

Thursday, November 30, 2017

रेशनिंगचे नियम

रेशनिंग मिळणे आपला हक्क वाचा जागृत व्हा जागृती करा आणि शेअर करा                                        
     *रेशनिंगचे नियम*
रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो.

इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

*रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही*

रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे.

आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे.

आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.

*रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन,भाव व देय प्रमाण, उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते*.

बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

*वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा*

*दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा*
*जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा*

*तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात*

*तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो*

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे.

ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

*लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते*

Tuesday, November 21, 2017

एक गंमत...

एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
😗😗

एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
😍😍😍

एक गंमत सांगू तुला ....?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
😓😓😓😓

एक गंमत सांगू तुला .....?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
😵😵😵😵😵

एक गंमत सांगू तुला ......?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
😰😰😰😰😰😒😭

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.
👆👆👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...💐
💎💎💎...ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.


म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠😠😠

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴💵💷

आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏💏💏

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश
😂😂😂😂😂😂
म्हणाले तरी चालेल. 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.
💃💃💃💃💃
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण,👶👶👶👶

'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, November 16, 2017

कचरा गोळा करणार्‍या निष्पाप कोवळ्या पोरी

कचरा गोळा करणार्‍या निष्पाप कोवळ्या पोरी
मळके कपडे केस पिंजले डोळ्यांवर लाचारी
गोणी पाठीवरी भुकेली आणि हुंदका ओठी
कुणी दिले हुसकून तरी जातात पुन्हा त्या दारी...

यांच्या गोणीमधे साचते शहरभराचे वाण
कुणी फेकते मळभ मनाचे कुणी विषारी घाण
हाक मारते कुणी कुणी तर कुणी येऊनी भिडते
हतबलतेला नसतो वाली मळते पुन्हा सहाण

अवेळीच तारुण्य उगवते स्वप्न भरडले जाते
दुनियेच्या कचर्‍यात मुके अस्तित्व हरवले जाते
रोज एक आजार नवा पोटात ढकलला जातो
कचर्‍याच्या धंद्यात आहुती भाळी लिहिले जाते ....

अभ्रक पिशव्या खोकी कागद जुनेपुराणे कपडे
दुनिया भरते गोणीमध्ये दारिद्र्याचे तुकडे
कुणी कुमारी माता बनते कुणी गाडले जाते
तरी स्वच्छता शहरामध्ये दिसते जिकडे तिकडे...

-- संतोष वाटपाडे

Tuesday, November 14, 2017

रंग पाण्याचे

खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..!

ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!

'पाणी' शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा   ..!

               रंग पाण्याचे

नयनामध्ये येता  'पाणी'
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!

                चटकदार तो पदार्थ दिसता,
                 तोंडाला या 'पाणी' सुटते,
                 खाता खाता ठसका लागून
                 डोळ्यांतून मग 'पाणी' येते..!

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते  'पाणी'..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते  'पाणी' ..!

                 "वळणाचे 'पाणी' वळणावरती"
                   म्हण मराठी एक असे,
                   "बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"
                   चतुराई यातुनी दिसे..!

लाथ मारूनी 'पाणी' काढणे,
लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे..!

                  उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
                  'पाण्या'त पाहणे गुण खोटा..  
                   'पाणी'दार ते नेत्र सांगती,
                    विद्वत्तेचा गुण मोठा..!

शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या 'पाणी' पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले..!

                   टपोर मोती दवबिंदूचे
                   चमचम 'पाणी' पानावरती,
                   क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
                   अळवावरचे अलगद 'पाणी'..!

कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या 'पाणी' होते..
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!

                    मायबाप हे आम्हां घडविती,
                     रक्ताचे ते 'पाणी' करूनी..
                     विनम्र होऊन त्यांच्या ठायी
                     नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडता 'पाणी'
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे' पाणी पाणी करती..!

                  अंतीम समयी मुखात 'पाणी'
                   वेळ जाणवे निघण्याची..
                   पितरांना मग 'पाणी' देऊनी,
                    स्मृती जागते आप्तांची..!

मनामनांतील भावनांचे,
'पाण्या' मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!

Wednesday, November 8, 2017

कहर

              
गुरुजी : गण्या सांग बर प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती.

गण्या : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस(पायथ्यागोरस)..!!

हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.

तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.

"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".

कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द , पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.

त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.

त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.

त्याच्या या सिद्धांताचे विचार वर्तुळ व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.

कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.

कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) कंस वापरतात.

यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.

गुरूजी ICU मध्ये आहेत.

Monday, November 6, 2017

दाजी अनं मेव्हणी

दाजी त्याच्या मेव्हणीला घेऊन आणि सासऱ्यासाठी बकरी घेऊन एका ओसाड वाटेवरून जात होता....
काळोख पडला होता. दाजी पुढे आणि मेव्हणी मागे...

दाजी...!

काय गं...??

मला तुमचं भ्या वाटून राहिलंय...!

आं...! आणि ते का...?

ही अशी आडवाट,
त्यात काळोख.
अवती भोवती कुनी बी न्हाय.
आता तुम्ही काई केलं तर..??

आगं, माझ्या येका हातात बादली त्यात समान,
दुसऱ्या हातात रश्शीला बांधलेली बकरी,
आणि ह्यो एक सोटा.
तुझ्याकडं कोंबडी आन पिशव्या. आता मी काय आन कसं करनारे..??

आसं कसं म्हंता!
ह्यो सोटा जिमिनीत गाडला, त्याला बकरी बांधली. माझ्याकडून कोंबडी हिसकावून घेऊन ती बादलीखाली ठेवली, आन सामान बाजूला ठेवलं की झालं ना हात मोकळं?
हितं पाहनारं भी कोनीच न्हाय...!

मला बाई लय भ्या वाटू लागलंया..

सौजन्य-wa