Saturday, January 20, 2018

रात्री माझं गावं विकताना पाहिलं

.           *रात्री माझं गावं विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गावं विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलिसाठी गरीबाला मि लाचार होताना पाहिल,
रात्री मि *माझ गाव विकताना पाहिल*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वताचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गावं विकताना पाहील*

गरिबांना पायदळी तुडवणार
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याच जोड केवढ घासल
वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी गावं विकताना पाहील*

लोकशाही ढाब्यावरच बसुन त्याने तोडलेत गरीबांचे आज लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली

त्या वाहणा-या विषारी दारुत
आज माझ गावही वाहिल,  मटनाच्या 2 रव्यापाई, पुन्हा 5वर्ष गरीबच राहील,,,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझ गावं विकताना पाहिल*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहील.....!
रात्री *मि गांव माझ विकताना पाहिल*

No comments:

Post a Comment